राज्यात ६४ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही, ७२ तालुक्यात प्रायोगिक तत्वावर १ डिसेंबरपासून आधार नोंदणी

64 lakh student still not have aadhar card registration in maharashtra
64 lakh student still not have aadhar card registration in maharashtra

नंदोरी (जि. वर्धा): राज्यात एकूण 1 लाख 10 हजार 395 शाळांमधून दोन कोटी 25 लाख 60 हजार 578 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. परंतु, यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याचे पुढे आल्याने ते योजनांपासून वंचित राहतात. सध्याच्या स्थितीत 64 लाख 59 हजार 388 विद्यार्थी आधारविना आहेत. अशा विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच आधार कार्ड अद्यावत करण्याचे काम येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 

आधी प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्‍याप्रमाणे एकूण राज्यात 72 तालुक्‍यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात नागपूर विभागात 12 तालुक्‍यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याचे खाते करणे आवश्‍यक आहे. यासाठी 816 आधारसंच उपलब्ध करून दिले आहेत. कामकाजासाठी आधार ऑपरेटरची सेवा त्रयस्थ संस्थेमार्फत उपलब्ध केली आहे. पूर्वतयारी बाबतच्या सूचनाही राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.

विद्यार्थीसंख्या, आधार केंद्र निश्‍चित करणे, त्यांच्याशी संलग्नित शाळा निश्‍चित करणे, तालुका स्तरावर समन्वयक अधिकारी निश्‍चित करणे आदी कामे पूर्ण करावी लागणार आहेत. शाळेमध्ये आधार केंद्र स्थापन करण्यासाठी स्वतंत्र खोलीसह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. इंटरनेट उपलब्ध करून देणे, दररोज 40 विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे कामकाज करावयाचे असल्याने विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.

आधार नोंदणी व अद्यावतीकरणाच्या कामकाजाचे सुक्ष्मनियोजन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहेत.

नागपूर विभागातील प्रायोगिक तत्त्वावर निवडलेले तालुके - 

जिल्हा    तालुका
भंडारा  भंडारा, पवनी
चंद्रपूर भद्रावती, नागभीड
गडचिरोली गडचिरोली, धानोरा
वर्धा हिंगणघाट, आर्वी
नागपूर सावनेर, पारशिवनी
गोंदिया तिरोडा, आमगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com