65 वर्षांच्या कमला यांना लागला पदवीचा ध्यास

मंगेश गोमासे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर : शिक्षणाला वय नसते असे म्हटले जाते. कोणाची इच्छा आणि प्रतिभा कधी जागृत होईल हे संगता येत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील विसोरासारख्या दुर्गम भागातील 65 वर्षीय महिलेला पदवी मिळवण्याचा ध्यास लागला असून, तिने इग्नुची बी.पी.पी. परीक्षा दिली आहे.
एकदा शिक्षण सुटल्यानंतर किंवा शिकण्याचे वय निघून गेल्यावर शिक्षण घेणे अवघड असते. संसाराच्या गाड्यात अडकलेल्या महिलांसाठी फारच कठीण असते. त्यातही गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी परिसरात राहणाऱ्या, जिथे प्राथमिक शिक्षणाची वाणवा तेथून कमला धाकडे ही महिला पुढे सरसावली आहे.

कमला यांचे चौथ्या वर्गापासून शिक्षण सुटले. अवघ्या तेरा वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले. संसाराचा गाढा ओढण्यातच त्यांचा वेळ गेला. त्यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा मनोमन राहून गेले. मात्र, परिसरातील महिला आणि मध्येच शिक्षण सुटलेल्या मुलींनी कुरखेडामधील इग्नुच्या सेंटरमध्ये बी.पी.पी. अभ्यासक्रम पूर्ण करीत पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्यातून अर्धवट शिक्षणाची मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधीच त्यांना मिळाली. यातूनच त्यांनी केंद्राच्या गौरी उईके यांची भेट घेऊन शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखविली. पदवी प्रवेशासाठी त्यांनी यावर्षी बी.पी.पी. अभ्यासक्रमात प्रवेश घेत परीक्षा दिली. ती उत्तीर्ण होताच बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची कमला धाकडे यांची इच्छा आहे.
कुटुंबाकडून मिळाले सहकार्य
शिक्षण घेण्याची जिद्द असली तरी कुटुंबाचा पाठिंबा तेवढाच महत्त्चाचा ठरतो. कमला धाकडे यांना घरातून सहकार्य मिळताच शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे गौरी उईके यांनी दिलेले धैर्य त्यांच्या बरेच कामी आले. त्यामुळे वयाचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: 65 year old Kamala degree news