esakal | 65 हजार अर्जदारांना मिळणार घरकुल
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

65 हजार अर्जदारांना मिळणार घरकुल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रात 1 लाख 65 हजार घरे असून जवळपास दीड लाख कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. महापालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 65 हजार अर्ज आले असून सर्वच 65 हजार अर्जदारांना हक्काची घरे मिळतील, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबा प्रमाणपत्र वाटप व तिसऱ्या घटकातील लाभार्थ्यांसाठी सोडत, या आयोजित कार्यकमात ते बोलत होते.
महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेत संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात शनिवारी (ता. 24) झालेल्या या कार्यक्रमास खासदार नवनीत राणा, आमदार डॉ. सुनील देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे, महापालिकेतील सर्व विषय समितीचे सभापती, झोन सभापती व नगरसेवक, नगरसेविका यांची पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पालकमंत्री म्हणाले, अतिक्रमित झोपडपट्या नियमानुकूल करून त्यांना पट्टे वाटप करण्याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. आगामी काळात अमरावती शहर झोपडपट्टीमुक्त झाले पाहिजे. या वेळी खासदार नवनीत राणा यांनी वर्ष 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या योजनेत आतापर्यंत फक्त 900 लाभार्थ्यांना घरे मिळाली, याचा उल्लेख करून निर्धारित कालावधीत सर्वांचे स्वप्न कसे पूर्ण होईल, अशा प्रश्‍न उपस्थित केला.
आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी घरकुल योजनेचे सर्वेक्षण वीस वर्षांपूर्वी करण्यात आल्याची माहिती देत यापूर्वी लोक आवास, वाल्मीकी योजनेनंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील अमरावती महापालिकेचे काम प्रशंसनीय आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी, योजनेतील चारही घटकांची माहिती सादर केली. संचालन महिला व बालकल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी केले. उपायुुक्त विजय खोराटे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास शहातील या योजनेत सामिल लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. सभागृह खच्चून भरले होते. तिसऱ्या घटकातील 54 लाभार्थ्यांची ऑनलाइन सोडत या वेळी पालकमंत्री, खासदार, आमदार व महापौरांच्या हस्ते काढण्यात आली. चौथ्या घटकातील लाभार्थ्यांना घरकुलाचे ताबा प्रमाणपत्र या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
अनेकांनी फिरवली पाठ
केंद्र व राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कार्यक्रमाकडे सत्ताधारी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, अरुण अडसड, रवी राणा, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे या प्रभूतींसह उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार, पक्षनेते सुनील काळे, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक तुषार भारतीय या महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली. मंचावर आमदार डॉ. सुनील देशमुख गटाचे नगरसेवक अधिक संख्येने होते. कॉंग्रेसच्या तीन महिला नगरसेवक उपस्थित होत्या.65 हजार अर्जदारांना मिळणार घरकुल

पालकमंत्र्यांचे आश्‍वासन ः लाभार्थ्यांना ताबा प्रमाणपत्र व सोडत
अमरावती, ता. 24 ः महापालिकेच्या क्षेत्रात 1 लाख 65 हजार घरे असून जवळपास दीड लाख कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. महापालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 65 हजार अर्ज आले असून सर्वच 65 हजार अर्जदारांना हक्काची घरे मिळतील, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबा प्रमाणपत्र वाटप व तिसऱ्या घटकातील लाभार्थ्यांसाठी सोडत, या आयोजित कार्यकमात ते बोलत होते.
महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेत संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात शनिवारी (ता. 24) झालेल्या या कार्यक्रमास खासदार नवनीत राणा, आमदार डॉ. सुनील देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे, महापालिकेतील सर्व विषय समितीचे सभापती, झोन सभापती व नगरसेवक, नगरसेविका यांची पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पालकमंत्री म्हणाले, अतिक्रमित झोपडपट्या नियमानुकूल करून त्यांना पट्टे वाटप करण्याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. आगामी काळात अमरावती शहर झोपडपट्टीमुक्त झाले पाहिजे. या वेळी खासदार नवनीत राणा यांनी वर्ष 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या योजनेत आतापर्यंत फक्त 900 लाभार्थ्यांना घरे मिळाली, याचा उल्लेख करून निर्धारित कालावधीत सर्वांचे स्वप्न कसे पूर्ण होईल, अशा प्रश्‍न उपस्थित केला.
आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी घरकुल योजनेचे सर्वेक्षण वीस वर्षांपूर्वी करण्यात आल्याची माहिती देत यापूर्वी लोक आवास, वाल्मीकी योजनेनंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील अमरावती महापालिकेचे काम प्रशंसनीय आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी, योजनेतील चारही घटकांची माहिती सादर केली. संचालन महिला व बालकल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी केले. उपायुुक्त विजय खोराटे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास शहातील या योजनेत सामिल लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. सभागृह खच्चून भरले होते. तिसऱ्या घटकातील 54 लाभार्थ्यांची ऑनलाइन सोडत या वेळी पालकमंत्री, खासदार, आमदार व महापौरांच्या हस्ते काढण्यात आली. चौथ्या घटकातील लाभार्थ्यांना घरकुलाचे ताबा प्रमाणपत्र या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
----
अनेकांनी फिरवली पाठ
केंद्र व राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कार्यक्रमाकडे सत्ताधारी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, अरुण अडसड, रवी राणा, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे या प्रभूतींसह उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार, पक्षनेते सुनील काळे, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक तुषार भारतीय या महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली. मंचावर आमदार डॉ. सुनील देशमुख गटाचे नगरसेवक अधिक संख्येने होते. कॉंग्रेसच्या तीन महिला नगरसेवक उपस्थित होत्या.

loading image
go to top