व्यापाऱ्याला 67 लाखांनी फसविले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

अमरावती - सोशल मीडियावरून स्वीकारण्यात आलेली फ्रेण्डरिक्‍वेस्ट अमरावतीच्या कैलास शिवप्रसाद तिवारी (वय 59 रा. विष्णूनगर, अमरावती) या कापड व्यापाऱ्यास महागात पडली. तोतयांनी त्यांची 66 लाख 99 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली. 

काही दिवसांपूर्वी तिवारी यांची एका महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाली. या महिलेने यूकेमधील फार्मास्युटिकल कंपनीला अकिकबरा हे हर्बल सीड्‌स पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी सत्तरटक्के कमिशन व्यापाऱ्यास आणि तीस टक्के फायदा हा कंपनीला होणार, अशी बतावणी संपर्क साधणाऱ्या महिलेने केली होती. तिवारी यांनी महिलेने सुचविलेल्या एका एजन्सीसोबत संपर्क साधला. जो माल एजन्सी पाठविणार होती, त्याचे वेतन त्यांना महिलेने दिलेल्या आठ बॅंक खातेक्रमांकावर तिवारी यांनी भरले. अकिकबरा हर्बल सीड्‌सच्या नावाने तिवारी यांना पाठविलेला माल नेमका खरा वा खोटा हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. शिवाय पैसे खात्यात जमा झाल्यानंतर ही व्यक्तीही आता अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिवारी यांनी केलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी डॉ. कॉसमॉस, उर्षा फर्डिनंड, अदिती शर्मा व अन्य एक अशा चौघांविरुद्ध शनिवारी (ता. 20) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यातील सर्वच आरोपी विदेशी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 67 million to the trader tricked