अकोला : 70 ते 80 गौवंशांची सुटका; एलसीबीची कारवाई

70 to 80 cows released in akola Action by LCB
70 to 80 cows released in akola Action by LCB

अकोला : हिवरखेड परिसरात कत्तली करिता गौवंशाची वाहतूक करणाऱ्या अठरा पिकअप वाहनांना अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. या दरम्यान अंदाजे 70 ते 80 गौवंशाची सुटका करण्यात आली असून आणखी गौवंश वाढण्याची शक्यता जात आहे. या प्रकरणी वाहन चालकासह काही जणांना ताब्यात घेतले तर काही जण घटना स्थळावरून पसार झाले आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममता वादे पोलीस कर्मचारी अब्दुल माजिद, शेख हसन, इजाज अहमद, रवी इरचे, संदीप कटाकर, भाऊलाल हेबार्डे, मनोज नागमते, अभय बावस्कर, ढोरे यांनी केली आहेय. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोलल्या जात आहे.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com