757 बंदुका, रिव्हॉल्व्हर होणार जमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे (बंदूक, रिव्हॉल्व्हर) जमा करण्याची प्रक्रिया पोलिस विभागाने सुरू केली आहे.

अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे (बंदूक, रिव्हॉल्व्हर) जमा करण्याची प्रक्रिया पोलिस विभागाने सुरू केली आहे.
निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी व निर्भयतेने मतदान करता यावे यासाठी परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच पोलिसांकडून जप्त केली जातात. ही शस्त्रे पोलिसांकडे जमा केल्या जावी, याकरिता पोलिस विभागाकडून शस्त्र परवानाधारकास नोटीस बजावल्या जाते. ती कारवाई सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्तालयातील दहा ठाण्याच्या हद्दीत 395 तर, ग्रामीण भागात 362 लोकांजवळ शस्त्र परवाने आहेत. निवडणूक आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर (निकाल जाहीर झाल्यावर) हीच अग्निशस्त्रे परत केल्या जातात.
अवैध शस्त्रांचे काय?
यापूर्वी आचारसंहिता काळात, काही अवैध अग्निशस्त्रे जप्त केली होती. परप्रांतामधून शस्त्रे आणण्यात येतात. निवडणूक आचारसंहिता काळात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर नजर वण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे आहे.
एक्‍साइज नाक्‍यावर सीसीटीव्ही
मतदारांना आमिष दाखविण्यासाठी देशी, विदेश मद्यासह बनावट मद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. राज्य दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाचे तपासणी नाके जिल्ह्यात आहेत. त्याठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 757 guns, revolver deposits