चंद्रपुरात वाळूतस्करांकडून कोट्यवधींचा दंड वसूल, १२६ वाहने जप्त, तर ८ गुन्हे दाखल

8 fir file against sand mafiya in chandrapur
8 fir file against sand mafiya in chandrapur

चंद्रपूर : वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया प्रशासकीयस्तरावर सुरू आहे. त्यामुळे घाटातून वाळू काढण्यावर बंदी आहे. अशास्थितीतही माफियांकडून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी महसूल विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. एकट्या चंद्रपूर तालुक्‍यात मागील दोन वर्षांत तब्बल 126 वाहने जप्त करण्यात आली. तस्करांकडून एक कोटी 23 लाख 68 हजार 855 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल केले, तर जप्त वाळूसाठ्याच्या लिलावातून तब्बल 18 लाख 53 हजार 500 रुपयांचा महसूल प्राप्त करण्यात चंद्रपूर तहसील प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावासाठी तालुकास्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केले जातात. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लिलावाच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा सादर केला जातो. पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर लिलावाची प्रक्रिया राबविली जाते. मागील दोन वर्षांपासून लिलावाच्या प्रक्रियेत थोडा विलंब होत आहे. लिलाव झाले नसतानाही माफियांनी वाळूची तस्करी थांबविलेली नाही. प्रशासनाच्या नजरेआड रात्रीबेरात्री वाळूची तस्करी केली जात आहे. महसूल विभागाकडून तस्करी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच मोठमोठ्या कारवायासुद्धा करण्यात आल्या आहेत. 

चंद्रपूर तालुक्‍यात 6 ते 7 वाळू घाट आहेत. यातील 4 घाट आजघडीला लिलावास पात्र आहेत. शासनस्तरावर मंजुरी मिळताच लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. परंतु, घाटातून वाळूची तस्करी होऊ नये म्हणून तहसीलदार नीलेश गौंड यांनी विशेष पथक तयार केले आहे. या पथकामार्फत मागील वर्षभरात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये वाळूतस्करीत एकूण 87 वाहने जप्त केली. या वाहनांकडून सुमारे 80 लाख 26 हजार 955 रुपयांचा दंड वसूल केला. वाळूचोरी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल केले. एवढेच नाही, तर जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करून त्यातून 18 लाख 7 हजार रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. 

2020-21 मध्ये एकूण 39 वाहने जप्त करण्यात येऊन त्यांच्याकडून 43 लाख 41 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला. जप्त वाळूच्या लिलावातून 46 हजार 500 रुपये प्राप्त झाले. तर, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल केले आहेत. तहसीलदार गौंड यांनी वाळूतस्करांवर कारवाई करीत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल वाचविला आहे. सोबतच दंडातून कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. 
 
हेही वाचा - फुलसांवगी आरोग्य केंद्रात फुलले जीव; कोरोना काळातही ३०२ मातांची प्रसूती

वाळू तस्करी रोखण्यासाठी एक पथक तयार -
चंद्रपूर तालुक्‍यात 6 ते 7 वाळू घाट आहेत. या घाटातून वाळूची तस्करी रोखण्यासाठी एक पथक तयार केले आहे. त्या माध्यमातून मागील दोन वर्षांत तब्बल 126 वाहने जप्त केली. एक कोटी 23 लाख 68 हजार 855 रुपयांचा दंड वसूल केला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल केले. जप्त वाळूसाठ्याच्या लिलाव केला. त्यातून 18 लाख 53 हजार 500 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. 
- नीलेश गौंड, तहसीलदार, चंद्रपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com