80 टक्के शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची होणार माती 

अनुप ताले
शुक्रवार, 1 जून 2018

अकोला - शासकीय हरभरा खरेदी २९ मे रोजी बंद झाली. मात्र ऑनलाइन नोंदणी केलेल्या १७ हजार ७८८ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे बाकी राहल्याने, नोंदणीकृत ८० टक्के हरभऱ्याची माती होणार आहे. 

अकोला - शासकीय हरभरा खरेदी २९ मे रोजी बंद झाली. मात्र ऑनलाइन नोंदणी केलेल्या १७ हजार ७८८ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे बाकी राहल्याने, नोंदणीकृत ८० टक्के हरभऱ्याची माती होणार आहे. 

खरेदीपूर्व ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची शासकीय निकषानुसार प्रत्यक्ष खरेदी २३ फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील काही केंद्रांवर सुरू झाली. थोड्या-थोड्या अंतराने इतर तालुक्यात केंद्र सुरू करत एकूण आठ केंद्रावर हरभरा खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र मुदत संपल्याने, २९ मे रोजी सर्व केंद्रावर प्रक्रिया थांबविण्यात आली. तोपर्यंत पाच हजार ४०१ शेतकऱ्यांकडून केवळ ८२ हजार ४१९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी पूर्ण झाली. मात्र अजूनही १७ हजार ७८८ शेतकऱ्यांकडील जवळपास दोन लाख क्विंटल हरभरा खरेदी करणे बाकी राहला आहे. आता शेतकऱ्यांना तो हरभरा व्यापाऱ्यांना विकणे किंवा साठवून ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही. परंतु, व्यापारी प्रतिक्विंटल केवळ तीन हजार रुपये भाव देत असल्याने, शेतकरी त्याचेकडे हरभरा विक्रीसाठी धजावत नाहीत. साठवणूक करावी तर, अल्पवधीतच भोंगे लागून या हरभऱ्याचे पीठ होणार हे नक्की, त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. 

प्रशासन, लोकप्रतिनिधींचे उदासीन धोरण 
सर्वच केंद्रांवर अतिशय संथ गतीने खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. त्याला साठवणूक व्यवस्था नसल्याचे कारण समोर करण्यात आले. मात्र, मुदत संपेपर्यंत या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला नाही. त्यांच्या उदासीन धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा हरभरा पुन्हा मातीत मिसळला जाणार असल्याचे मत, शेतकरी नेत्यांनी व्यक्त केले आहे. 

मुदतसंपल्यानंतरची जिल्ह्यातील स्थिती 
तालुका केंद्र संख्या ऑनलाइन नोंदणी खरेदी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या खरेदी (क्विं.) शिल्लक शेतकरी 

अकोला १ ४७६९ ९७२ १७२६०.०० ३७९७ 
अकोट १ ५९६१ १०४२ १५८५१.९५ ४९१९ 
तेल्हारा १ ३९०५ ५२२ ८०७६.०० ३३८३ 
मूर्तिजापूर १ ३३४३ २५० ४१४७.५० ३०९३ 
बाळापूर २ २३३७ १५२० २१५०६.०० ८१७ 
बार्शीटाकळी १ १९९६ ८१८ ११८७४.५० ११७८ 
पातूर १ ८७८ २७७ ३७०३.५० ६०१ 
एकूण ८ २३१८९ ५४०१ ८२४१९.४५ १७७८८ 

Web Title: 80 percent of farmers will not get price for gram