90 टक्के एटीएम "ड्राय'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नागपूर - नोटाबंदी निर्णयाला तीन आठवडे उलटल्यानंतरही त्याचे पडसाद बाजारपेठेत अजूनही उमटत आहेत.  रविवारची आठवड्याची सुटी असल्याने बाजारपेठ शांत होती. मात्र, बॅंका बंद असल्याने शहरातील एटीएम सेंटरकडे रोख काढण्यासाठी धाव घेतली. परंतु, शहरातील 90 टक्के एटीएम ड्राय होते. त्यामुळे ग्राहकांना पैशासाठी पायपीट करावी लागत होती. रोख असलेल्या एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

देशभरातील बॅंका काल चौथ्या शनिवारी आणि  रविवार असे दोन दिवस बंद होत्या. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर लोकांनी एटीएम आणि बॅंकांबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. एटीएममधून ठराविक रक्कमच मिळत असल्याने मोठ्या व्यवहारांसाठी बॅंकेबाहेर लागलेल्या लांब रांगेत उभे राहावे लागत होते. ही परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत असताना सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे एटीएमबाहेर शनिवारीच रांगा पुन्हा वाढल्या.

दोन दिवस खोळंबा
काही एटीएमच्या शटर अर्धवट बंद स्थितीत होते. त्यामुळे ग्राहकांची रोख रक्कम काढण्यासाठी चांगलीत पायपीट करावी लागत होती. त्यात युवावर्ग अधिक होता. त्यामुळे व्यवहारांवर मर्यादा आल्या होत्या. दोन दिवसांचे खोळंबलेले व्यवसाय सोमवारी सकाळी बॅंका सुरू झाल्यानंतर पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे आहेत.

नो कॅश, एटीएम बंद
रविवारी शहरातील रामदासपेठ, त्रिमूर्तीनगर, सदर, सक्करदरा, कळमना बाजार, इतवारी, गांधी बाग, मानेवाडा, इंदोरा, महाल, नंदनवन, सेंट्रल एव्हेन्यू, टेलिफोन एक्‍सचेंज परिसर, शांतीनगर, मेडिकल चौक परिसर, रेशीमबाग, जरीपटका, खामला, नरेंद्रनगर, मनीषनगर, बेसा रोड, उदयनगर, धरमपेठ, शिवाजीनगर यासह शहरातील अनेक परिसरातील एटीएमसमोर "नो कॅश', "एटीएम बंद' असे फलक लागले होते.

Web Title: 90 per cent of the ATM