कोटगाव शिवारातून 91 हजारांच्या विद्युत तारा लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

उमरेड (जि.नागपूर ) :  तालुक्‍यातील कोटगाव शिवारातून एकूण 7 विद्युत खांबांवरील ऍल्युमिनियम तारा चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

उमरेड (जि.नागपूर ) :  तालुक्‍यातील कोटगाव शिवारातून एकूण 7 विद्युत खांबांवरील ऍल्युमिनियम तारा चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. चोरी गेलेला मुद्देमाल अंदाजे 91 हजारांचा होता, असे महावितरण सहायक अभियंता (ग्रा.) गिरीश रविशंकर मडामे यांनी सांगीतले. 31 जुलै ते 1 ऑगस्टच्या दरम्यान रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत आरोपींनी कोरगाव शिवारातील पूजा देवतळे यांच्या शेतातील 4 विद्युत खांब व आवारी बाबा मंदिराजवळील 3 विद्युत खांबांवरील अशा एकूण 7 विद्युत खांबांवरील तारा चोरून नेल्याच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. वर्षभरात 74 किलोमीटर लांबीच्या विद्युततारा चोरी गेल्या असून त्यांची किंमत सुमारे दीड कोटीच्या घरात आहे, अशी बाब महावितरणच्या माहितीनुसार लक्षात आली. अशा चोरीच्या अनुचित प्रकारांमुळे नागरिकांना अनियमित विद्युत पुरवठ्याला सामोरे जावे लागते. गेल्या काही महिन्यांपूर्वी पाहणी चिचाळा या भागातील विद्युत खांबांवरील विद्युत तारांची चोरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. किनाळा, शिरपूर, मकरधोकडा, उकरवाही, हेटी चारगाव, कळमना, गावसुत अशा एकूण 26 ठिकाणी चोरांनी हात साफ केला. 2018 च्या मे महिन्यापासून विद्युत वाहिन्यांवरील वीजप्रवाह बंद करून ऍल्युमिनियम तारा लंपास केल्या जात आहेत. जिवंत तारांशी छेडछाड करणे चोरट्यांच्या जिवावर बेतू शकते, याची जाणीव असूनसुद्धा चोरट्यांची तारेवरची कसरत सुरूच असते. अशा घटना झाल्यानंतर महावितरणला नव्या साधनांची जुळवाजुळव करणे, हे आव्हानात्मक ठरते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 91 thousand lightning lamps from Kotgaon