डॉक्टरकडून शिपायाला अमानुष मारहाण; Video व्हायरल

हा व्हिडिओ विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातला आहे
Viral Video
Viral Videoसकाळ डिजिटल टीम

एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करत अमानुष मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारहाण करणारी व्यक्ती विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तर मार खाणारा व्यक्ती येथील शिपाई असल्याचे बोलले जात आहे.

Viral Video
बहाणे नकोय, दोषींवर कारवाई करा; बीर भूम हिंसाचार प्रकरणी ममतांचे आदेश

या व्हिडीओवरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. डॉक्टर पदावर असणारा व्यक्ती समोरच्याला इतकं बेदम का मारतोय आणि हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सोशल मिडियावर उपस्थित केला जात असून या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जात आहे.

Viral Video
शासनाची मदत घ्या, अन्‌ कर्मचाऱ्यांचे वेतन द्या! सुप्रिम कोर्टाचे आदेश

या डॉक्टरचे नाव डॉ. कडस्कर असल्याचे तर मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव नारायण उइके असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमागे काय सत्यता आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणावर तपास करण्याची मागणी जोर धरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com