esakal | बुरखाधारी युवकाचा चंद्रपुरात गोळीबार; भरदिवसा घडली घटना
sakal

बोलून बातमी शोधा

घटनास्थळी तपास करताना पोलिस

बुरखाधारी युवकाचा चंद्रपुरात गोळीबार; भरदिवसा घडली घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : बुरखाधारी युवकाने केलेल्या गोळीबारात (shooting in Chandrapur) युवक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. १२) दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात घडली. आकाश उर्फ चिन्ना अंदेवार असे जखमी युवकाचे (youth injured) नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. वृत्त लिहिस्तोवर स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून एका युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. (A-youth-was-injured-in-a-shooting-in-Chandrapur)

चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये अनेक दुकाने आहेत. त्यामुळे नागरिकांची येथे नेहमीच गर्दी असते. आज दुपारच्या सुमारास आकाश उर्फ चिन्ना अंदेवार हा युवक कामानिमित्त आला होता. यावेळी त्याच्या मागावर काही युवक होते. यातील एका बुरखाधारी युवकाने अंधाधुंद गोळीबार करणे सुरू केले. तीन गोळ्या त्याने झाडल्या. यातील एक गोळी आकाशला लागून गंभीर जखमी झाला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

हेही वाचा: ॲसिडिटी, डोकेदुखीचा आहे त्रास? मग प्या तरेट्याची कॉफी

भर दिवस घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. जखमी आकाशला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिसर सील करून तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले.

त्यानुसार वेगवेगळे पथक तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने संशयित म्हणून एका युवकाला ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी बल्लारपूर येथे सूरज बहुरिया हत्याकांड घडले होते. आजच्या गोळीबाराला त्या हत्याकांडाची किनार असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास सुरू आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

(A-youth-was-injured-in-a-shooting-in-Chandrapur)

loading image