Aadhaar card : विद्यार्थ्यांच्‍या आधारकार्डची शिक्षकांना डोकेदुखी

अपडेट करण्याबाबत सतत अडचणी; ३० एप्रिलपर्यंतची मुदत
Aadhaar card of students problems with updating Deadline till 30th April
Aadhaar card of students problems with updating Deadline till 30th Aprilesakal

खामगाव : शालेय शिक्षण विभागाकडून (ता.३०) एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याच्‍या सुचना शाळांना देण्यात आल्‍या आहेत. मात्र, आधारकार्ड अपडेट करताना तांत्रिक अडचणी येत असल्‍याने शिक्षकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

संचमान्‍यता पदस्‍थापना यामुळे शिक्षक सध्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याच्‍या कामासाठी धावपळ करत आहेत. अनेक शिक्षक आधार केंद्रावर स्‍वतःच्‍या वाहनातून विद्यार्थ्यांना नेत आधार दुरुस्‍ती करत आहे.

आधारकार्ड अपडेट करण्याची वेबसाईट सतत बंद राहत आहे. त्‍यामुळे शिक्षकांची गैरसोय होत आहे. प्रत्‍येक शाळेची संच मान्‍यता ही विद्यार्थी संख्येवर दिली. पुर्वी वर्गातील संख्या विद्यार्थ्यांची शिरगणती केली जात होती. आता शैक्षणिक वर्षात आधार प्रमाणित झाले नाही तर त्‍या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या उपलब्‍ध नाही असे गृहीत धरुन वर्गातील संच मान्‍यता रद्द केली जाणार आहे.

परिणामी शिक्षकांची पदेच अतिरिक्‍त होण्याची भीती आहे. त्‍यामुळे शिक्षकांमध्ये धास्‍ती वाढली आहे. शाळेमध्ये सध्या शिक्षकांच्‍या मागे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणित करण्याचे काम लागले आहे.

या ऑनलाईन प्रक्रिया दरम्‍यान, विद्यार्थ्यांच्‍या नावांमध्ये तसेच जन्‍मतारखेमध्ये बदल असल्‍यास ते आधार वैध नोंदणीस अडचण येत आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्‍या आधार वरील नाव, जन्‍म तारखा दुरुस्‍ती करुन शिक्षकांना आॅनलाईन नोंद करण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभागाकडून ३० एप्रिलयपर्यंत आधार अपडेट करुन ऑनलाईन करण्याच्‍या सुचना असल्‍याने शिक्षकांची धावपळ वाढली आहे.

विद्यार्थी शोध मोहिमही होणार सुरू

जिल्‍हा परिषद शाळेत दिवसेंदिवस घटत जाणारी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाच्‍या वतीने शिक्षकांना उन्‍हाळ्यांच्‍या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी शोधून त्‍यांना जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्याची नवीन जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्‍यामुळे आधार अपडेटचे काम पुर्ण झाले की, लगोलग शिक्षकांमागे विद्यार्थी शोधमोहीम सुरु होणार आहे.

दिवसभर बसून सुध्दा आधार अपडेट करण्याची वेबसाईट अनेकदा बंद पडते. दिवसभरात एक किंवा दोन विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट होत आहे. यावर शासनाने काही तरी तोडगा काढावा. नाहीतर मुदत संपण्याच्‍या दिवसापर्यंत देखील आधार अपडेटचे काम अपुर्ण राहील.

— अनिल काळे, सहशिक्षक खामगाव

आधार अपडेट करताना अनेक विद्यार्थ्यांचे बोटांचे ठसे येत नाहीत. त्‍यामुळेही कामात विलंब होत आहे. ऑनलाईन करण्यास विविध तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. शासनाने या तांत्रिक अडचणींकडेही लक्ष द्यावे.

— कोंडीराम कांदे, सहशिक्षक, नांदुरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com