यवतमाळ जिल्ह्यात आधार लिंकिंगचे काम पूर्ण होणार कधी? आतापर्यंत फक्त अडीच लाख पूर्ण  

चेतन देशमुख
Thursday, 3 December 2020

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतंर्गत जिल्ह्याभरात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील तीन लाख 49 हजार 478 नावे निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार ज्यांची नावे आली होती, त्या नागरिकांचे आधार कार्ड प्रमाणिकरण करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. 

यवतमाळ: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत कुटुंब सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांची ऑनलाइन आधार कार्ड लिंगिंकची प्रक्रिया करण्यात येत आहे. केंद्र शासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आधार प्रमाणीकरणाचे निर्देश दिलेले आहेत. महिनाभराची मुदतवाढ देऊनही चार तालुक्‍यांचे काम संथगतीने सुरू असून, त्यात बाभूळगाव, पुसद, उमरखेड व झरी जामणी या तालुक्‍यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतंर्गत जिल्ह्याभरात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील तीन लाख 49 हजार 478 नावे निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार ज्यांची नावे आली होती, त्या नागरिकांचे आधार कार्ड प्रमाणिकरण करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. 

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना या योजनेतील संबंधित कुटुंबांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतनिहाय आधार प्रमाणिकरणाचे काम उद्घस्तरावर सुरू करण्यात आले होते. मात्र, 31 जुलैपर्यंत आधार नोंदणीच झाली नव्हती. अखेर प्रशासनाला ह्यात मुदतवाढ देण्याशिवाय पर्याच उरला नव्हता. 

आतापर्यंत दोन लाख 71 हजार 524 कुटुंबांची आधार नोंदणी झाली आहे. उर्वरीत नोंदणी 31 ऑगस्टपर्यंत करण्याची सूचना होती. मात्र, मुदतवाढ देऊनही अजूनही योजनेला गती आलेली नाही. जिल्ह्यातील 16 तालुक्‍यांतील चार तालुक्‍यांनी अजूनही गती पकडलेली नाही. इतर तालुक्‍यांचे कामे 98 टक्के झाले असताना बाभूळगाव, पुसद, उमरखेड व झरी जामणी या तालुक्‍यांचे कामे मंदावले आहे. 

कामे पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासन कट ऑफ लिस्ट जारी करणार आहेत. त्यानंतर शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजेनुसार लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने पात्र ठरविलेली यादीचे वाचन ग्रामसभेत केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे या योजनेत अनेक अडचणी आल्या. मात्र, प्रशासकीयस्तरावरून त्या अडचणींची सोडवणूक करून लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. 

आधार प्रमाणिकरणाचे काम जवळपास 80 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. 31 ऑगस्टची मुदत संपल्यानंतरही चार तालुक्‍यांचे कामे बाकी आहेत. लवकरच ही यादी अंतिम करून केंद्र शासनाला पाठविली जाणार आहे. योजनेत सहा लाख 21 हजार सदस्य आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून घरकुलाचा निधी न आल्याने लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

लॉकडाउनमुळे आल्या अनेक अडचणी

आधार नोंदणीचे काम साधारणतः एप्रिल महिन्यापासून सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत लॉकडाउन करण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळात सर्व बंद असल्याने आधार कार्ड लिंकिंग करण्याकरिता घरकुल लाभार्थ्यांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागले. आता सर्व अडचणी दूर झाल्या असून, आधार नोंदणी अंतिम टप्प्यात आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar linking is very slow in Yavatmal district