वाडीची आकांक्षा "अँटी टेरीरिझम विशेषज्ञ'

विजय वानखडे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वाडीची आकांक्षा "अँटी टेरीरिझम विशेषज्ञ'
वाडी (नागपूर) : येथील आकांक्षा खाकसे हिने गुजरात येथील फारेन्सिक सायन्स विद्यापीठातून होमलॅण्ड सेक्‍युरिटी आणि अँटी टेरीरिझम या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविणारी जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी ठरण्याचा मान ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही पदवी आकांक्षाने स्वीकारली.

आकांक्षाने मिळविलेल्या यशाबद्दल वाडी येथे सत्कार करण्यात आला. अभ्यासक्रमाविषयी आकांक्षा म्हणाली, जगातील सर्वच देश सध्या दहशतवादाच्या समस्येचा सामना करीत आहेत. सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. न्यायालयीन व तपास प्रक्रियेत अद्ययावत तपासणीची गरज आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. हे सर्व लक्षात घेता या नावीन्यपूर्ण क्षेत्रात चांगला स्कोप आहे. होमलॅण्ड सिक्‍युरिटी व अँटी टेरीरिझम या अभ्यासक्रमात दोन शैक्षणिक सत्रात नागपुरातील केवळ दोन विद्यार्थ्यांना ही पदवी मिळाली आहे. एक आव्हानात्मक व नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचे क्षेत्र लक्षात घेता व आवड असल्यास निवडण्यास हरकत नाही व सोबत प्रशासकीय व स्पर्धा परीक्षा देण्याचा मार्ग ही आहेच असे मत व्यक्त केले. फॉरेन्सिक पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढत असल्याचेही दिसून येत असल्याचे आकांक्षा म्हणाली. या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेता फॉरन्सिक विद्यापीठाचे अपग्रेडेशन करण्यासाठी केंद्र व गुजरात सरकारने 300 कोटींच्या निधी दिला. ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षान्त समारोहात केली.
रोजगाराची संधी
देशात 1 लाखाहून अधिक दहशतवादी प्रतिबंधक तज्ज्ञांची गरज आहे. पोलिस व सुरक्षा यंत्रणा, न्यायवैद्यक क्षेत्र, मोठे कार्पोरेट क्षेत्र या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. फॉरेन्सिक विद्यापीठ 30 विविध प्रकारचे अभ्यासक्रम संचालित करतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केला विद्यार्थी पोलिस, रक्षा विभागात सहज नोकरी मिळवू शकतात असेही आकांक्षाने सांगितले.

Web Title: aakansha Anti Terrorism Expert