आमिर खानचे राणवाडीत श्रमदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

वर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्‍यातील राणवाडी गावात आज, मंगळवारी सिनेअभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी श्रमदान केले. येथील दृष्टिहीन बंडू धुर्वे याने गावातील नागरिकांना प्रोत्साहित करून पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाला सुरुवात केली. याची दखल घेत आमिर खान पत्नीसह सकाळी नऊला गावात पोचला. यावेळी त्यांच्यासोबत अंध असलेल्या पाणी फाउंडेशनच्या  युवकांनीही श्रमदान केले. यावेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, तहसीलदार  कुमावत, गटविकास अधिकारी उमेश नंदगवळी, पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय आदी उपस्थित होते.

वर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्‍यातील राणवाडी गावात आज, मंगळवारी सिनेअभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी श्रमदान केले. येथील दृष्टिहीन बंडू धुर्वे याने गावातील नागरिकांना प्रोत्साहित करून पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाला सुरुवात केली. याची दखल घेत आमिर खान पत्नीसह सकाळी नऊला गावात पोचला. यावेळी त्यांच्यासोबत अंध असलेल्या पाणी फाउंडेशनच्या  युवकांनीही श्रमदान केले. यावेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, तहसीलदार  कुमावत, गटविकास अधिकारी उमेश नंदगवळी, पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील आर्वी तालुक्‍यातील ४५, कारंजा ९०, सेलू ४५, देवळी व वर्धा येथील गावे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेत सहभागी गावात लोकसहभागातून तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, दगडीबांध, बांधबंदिस्ती, शोषखड्डे, रोपवाटिका, आगपेटीमुक्त शिवार यांसारखी कामे करण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांचा व सामाजिक संस्थेचा मोठा सहभाग मिळत आहे. यावेळी आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनचे दिव्यांग कार्यकर्ते बंडू धुर्वे यांच्यासोबत संवाद साधला. तसेच दिव्यांगांसोबत क्रिकेट सामन्याचा आनंदही घेतला.

Web Title: Aamir Khan in Ranawadi Shramdan