आमिरचा वॉटरकप नरखेडमध्ये

Aamir-Khan
Aamir-Khan

नागपूर/जलालखेडा - सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने यंदा नरखेड तालुक्‍याची निवड झाली असून, एकूण ६५ गावांमध्ये जलसंधारणातून मनसंधारण साधण्यात येणार आहे. उपक्रमातून यापूर्वी अनेक गावांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली आहे. स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये ज्या गावांचा समावेश होईल, तेथील काम बघण्यासाठी खुद्द आमिर खान येणार आहे.

नरखेड तालुक्‍यात पाण्याची पातळी सर्वाधिक खोल असल्याने हा तालुका दुष्काळाच्या सावटात आला आहे. पाणी फाउंडेशनच्या या उपक्रमातून गावात जलक्रांती व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. तालुक्‍यातील १५५ गावांपैकी सुरुवातीला १०१ गावांनी सहमती दर्शविली; परंतु स्पर्धेतील काही टप्पे काही गावांना पूर्ण करणे शक्‍य झाले नाही. अखेर या स्पर्धेसाठी ६६ गावांची निवड झाली.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या गावांनी स्पर्धेपूर्वीची सांडपाण्याचे शोषखड्डे, नर्सरी, आगपेटीमुक्त शिवार, माती परीक्षण ही कामे पूर्ण केली आहेत. ८ एप्रिल ते २२ मार्च हा स्पर्धेचा कालावधी आहे. गावकरी जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गावागावांत बैठका, चर्चा व नियोजनाचे फड रंगत आहे. लहानथोरांबरोबरच महिलाही या स्पर्धेत खांद्याला खांदा लावून उतरल्या आहेत.

स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावाला १० ते ५० लाखांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. गाव जलसमृद्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलवकडे परिश्रमही घेत आहेत.

जिओ टॅगिंगच्या माध्यमातून माहिती थेट मुंबईत बसलेल्या व्यक्तींना होणार आहे. त्यांच्याकडून स्पर्धेचे नियंत्रण होत आहे. प्रत्येक कामासाठी गुणांक निश्‍चित केला आहे. सर्वांत जास्त गुण मिळणाऱ्या गावांना पारितोषिक मिळणार आहे.
- पल्लवी तलमले, कृषी वर्ग २ च्या अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com