शॉकमध्ये गेल्याने आराध्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

नागपूर - गोवर-रुबेला लसीकरणानंतर भंडारा जिल्ह्यातील ११ महिन्यांची मुलगी आराध्या वाघाये दगावली होती. काही दिवसांतच आस्थाही दगावली. आराध्या व आस्थाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी मेडिकलमध्ये चौकशी समिती गठित झाली. समितीने प्राथमिक चौकशीनंतर हिस्टोपॅथॉलॉजीच्या अहवालानंतरच तांत्रिक कारण स्पष्ट होईल, असे सांगितले होते.

आराध्या लसीकरणानंतर ‘शॉक’मध्ये गेली आणि मृत्यू झाला तसेच आस्थाला डायरिया असल्याचे हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातून पुढे आले आहे. या प्रकरणामुळे दोन्ही मृत्यूला वेगळे वळण देण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सुरू मेडिकल वर्तुळात सुरू झाली आहे.

मेडिकल प्रशासनाने आराध्या व आस्थाच्या मृत्यूनंतर गठित केलेल्या चौकशी समितीत मेयो रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी. एम. बोकडे, मेडिकलच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन व डॉ. सायरा मर्चंट हे तीन वरिष्ठ डॉक्‍टर होते. त्यांनी दोन दिवस आराध्याच्या नातेवाइकांसह विविध रिपोर्ट बघून अहवाल तयार केला. उपचारासंदर्भातील केसपेपर तपासले. ‘क्‍लिनिकल ऑटोप्सी’चा प्राथमिक अहवालही बघितला.

आराध्या लसीकरणानंतरच ‘शॉक’मध्ये गेली. शॉकमध्ये गेल्याने अवयव निकामी होत गेले. प्रसंगी ती दगावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. परंतु, हिस्टोपॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजीचा अहवाल प्रलंबित होते. हिस्टोपॅथॉलॉजीचा अहवाल आल्याने तांत्रिकदृष्ट्या मृत्यूला लसीकरणानंतर ‘शॉक’ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नुकसानभरपाई द्या!
आराध्या व आस्था या चिमुकल्यांची कुटुंबे हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य जगत आहेत. दोघींच्याही मृत्यूने भंडाऱ्यात लसीकरणावर संशय व्यक्त करण्यात आला होता. राज्यात सोलापूर व इतर ठिकाणी लसीकरणाने झालेल्या मृत्यूनंतर नुकसानभरपाई दिली आहे. यामुळे आस्था व आराध्याच्या कुटुंबालाही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी इंटकतर्फे करण्यात आली. या प्रकरणांची चौकशी निष्पक्षपणे करावी, अशीही मागणी त्रिशरण सहारे यांनी केली आहे.

Web Title: Aaradhya death after going to shock