आराध्या लसीकरणाने दगावल्याची शंका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नागपूर - अकरा महिन्यांची भंडारा जिल्ह्यातील आराध्या वाघाये गोवर-रुबेला लसीकरणापूर्वी ठणठणीत होती. लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडली. शरीरातील अवयव निकामी होत गेल्याचे अहवालातून व्यक्त करतानाच लसीकरण कारणीभूत ठरू शकते, अशी शंका चौकशी समितीकडून व्यक्त करण्यात आली. शनिवारी मेडिकल प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यामुळे लसीकरणावरच संशय उपस्थित झाला आहे.

मेडिकल प्रशासनाने आराध्याच्या मृत्यूनंतर गठित केलेल्या चौकशी समितीत मेयो रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी. एम. बोकडे, मेडिकलच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन व डॉ. सायरा मर्चंट हे तीन वरिष्ठ डॉक्‍टर होते. त्यांनी दोन दिवस आराध्याच्या नातेवाइकांसह विविध रिपोर्ट बघून अहवाल तयार केला.

उपचारासंदर्भातील केसपेपर तपासले. ‘क्‍लिनिकल ऑटोप्सी’चा प्राथमिक अहवालही बघितला. आराध्या लसीकरणानंतरच ‘शॉक’मध्ये गेली. शॉकमध्ये गेल्याने चिमुकलीचे अवयव निकामी होत गेले. प्रसंगी ती दगावल्याची चर्चा पुढे आली. सध्या हिस्टोपॅथोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचा अहवाल प्रलंबित आहे.  त्यामुळे तूर्तास तांत्रिकदृष्ट्या मृत्यूला लसीकरणच कारणीभूत असल्याचे पूर्णपणे स्पष्ट करता येत नाही, असे समितीने नमूद केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला आहे. 

आराध्याला पूर्वी कोणताही आजार नव्हता. तिची प्रकृती लसीकरणानंतरच बिघडली, हे स्पष्ट झाले. यामुळे लसीकरणावर गंभीर प्रश्‍न उपस्थित केला आहे. सोलापूरमध्ये एक जण दगावल्यानंतर पालकमंत्र्यांनी पाच लाखांची मदत पीडित कुटुंबाला केली होती. आराध्याच्याही कुटुंबाला पाच लाखांची मदत करावी.
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, आरोग्य वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना, नागपूर. 

भंडाऱ्यातील दुसरा रुग्ण भरती
आराध्याच्या मृत्यूपूर्वी भंडाऱ्यातील एकूण तीन रुग्ण येथे उपचार घेत होते. शनिवारी आणखी एक मुलगा लसीकरणामुळे आजारी पडल्याचे कारण सांगत मेडिकलमध्ये रेफर झाला आहे. आरोग्य विभागानेच रेफर केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या दोघेजण मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत.

Web Title: aaradhya health failed after vaccination