चार लाखांसाठी केला गर्भपात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

अमरावती - माहेरून चार लाख रुपये आणण्यासाठी नकार दिल्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गर्भपात करून घेतला. गाडगेनगर पोलिसांनी पोलिस पती आणि कुटुंबातील अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

अमरावती - माहेरून चार लाख रुपये आणण्यासाठी नकार दिल्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गर्भपात करून घेतला. गाडगेनगर पोलिसांनी पोलिस पती आणि कुटुंबातील अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

भूषण मनोज पदमने (ब.नं. 1807) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव असून, छळ करण्यात कुटुंबातील चेतन मनोज पदमने (रा. सुरभी ले-आउट) यासह एका महिलेचाही समावेश आहे. माहेरून चार लाख रुपये आणण्याचा पतीसह सासरच्यांनी तगादा लावला. पैसे न आणल्यामुळे छळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावर समाधान झाले नाही म्हणून पतीसह सासरच्यांनी काहीतरी खायला देऊन गर्भपात केला, असा आरोप पीडित विवाहितेने गाडगेनगर पोलिसांत दाखल तक्रारीत केला आहे. 

Web Title: Abortion for Four lac

टॅग्स