पटवाऱ्यांच्या प्रतीक्षेत, वारीवारी जन्म मरणातेवारी!

file photo
file photo

मेंढला (जि.नागपूर) ः नरखेड तालुक्‍यातील मेंढला हे पंचायत समिती सर्कलमधील एक छोटेसे गाव. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, पटवारी कार्यालये अशा महत्त्वाच्या वास्तू आहेत. पण, नरखेड येथील अधिकारी गावाकडे सपेशल दुर्लक्ष करतात. येथील पटवारी तर शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाच्या वाऱ्या घडविण्यात मातब्बर असावेत, असे वाटते.

देवालाच माहीत
मेंढला येथील पटवारी गेल्या चार महिन्यांपूर्वीच बदलून गेले. पण, त्यांच्या जागी दुसरे पटवारी कोणीच आले नाही. दुसऱ्या कुणाकडे तरी प्रभार आहे, पण ते कधी येतात हे देवालाच माहीत. शेतकरी, शाळेचे विद्यार्थी, श्रावणबाळ योजनेसाठी लागणाऱ्या कागदांसाठी वारंवार चकरा मारतात. तेथे नागरिक पटवाऱ्यांची वाट पाहात झाडाच्या आडोशाला तासनतास बसतात. शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडते. रोज तिथे जाणे आणि घरी वापस जाणे, हेच त्यांच्या जगण्याचे सार्थक असावे, असे वाटते. शाळेचे विद्यार्थीही कार्यालयाची रोज हजरी लावतात. त्यांचेसुद्धा काम होत नाही. त्या कार्यालयाला नेहमी कुलूप लागलेले दिसते. येथील ग्रामविकास अधिकारी व कोतवाल हे पद रिक्त आहे.

वेड्यासारखे वाट पाहणे नशिबी
मेंढला या गावामध्ये मेंढला, सिंजर, भय्यापूर (रिठी), साखरखेडा, दावसा, महाजनपूर, खरबडी , पिपळदरा, बानोरचंद, वाढोणा इतर काही गावे आहेत. या गावातील लोक वेड्यासारखे नुसते जाणे-येणे करण्यातच वेळ घालवितात. कोणाचेही काम होत नाही. तसेच कोतवालपदसुद्धा रिक्त असल्यामुळे विचारण्याची सोय नाही. तिथे एक मुलगा रोजंदारीवर काम करतो. साहेब आले की तेव्हाच त्याला मजुरी मिळते. बाकी दिवसाची मजुरी त्याला मिळत नाही, आहे ना आश्‍चर्य?सध्या पटवाऱ्यांचा प्रभार दावसा येथील पटवाऱ्याकडे दिला आहे. ते कधी येतात, त्यांचे वेळापत्रक माहीत नसल्यामुळे वारीवारी जन्म मरणाते वारी, असा एकंदरीत कारभार आहे. मेंढला कार्यालयाला स्थायी पटवारी द्यावा, अशी गावकरी मागणी करीत आहेत.

मी याविषयी नरखेड येथे तक्रार केली. शेतकरी, वृद्ध शाळेतील विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागतात. स्थायी पटवारी अजून आले नाहीत. लवकर पटवारी जर मिळाला नाही तर संपूर्ण गावकरी आंदोलन करतील.
नंदू चरपे
उपसरपंच, मेंढला

मी रोज या कार्यालयात जाऊन पहाते. पण इथे मला कुलूपच लागलेले दिसते. त्यामुळे मी श्रावणबाळ योजनेपासून वंचित आहे .
अनुसया सातपुते
वृद्ध महिला, मेंढला
 
पटवारी बदलून गेले तेव्हापासून येथे स्थायी पटवारी आले नाही. दुसऱ्या पटवाऱ्यांकडे प्रभार आहे. मला शाळेच्या कामासाठी उत्पनाचा दाखला पाहिजे. एक महिन्यांपासून मी नुसते चकरा मारत आहे. दाखला अजून मिळाला नाही.
प्रीतम नाडेकर
शाळकरी विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com