अमरावती : दुकानात बिस्कीटचा पुडा घेण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर (वय 17) घरात डांबून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी शिरखेड पोलिसांनी संशयित आरोपी हरिष ऊर्फ हरी रामदास वाडीभस्मे (वय 32) विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
जिल्ह्यातील शिरखेड ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. तीन) ही घटना घडली. हरिषविरुद्ध छोट्या, मोठ्या चोऱ्या करणे, अवैध दारू विक्री प्रकरणात बरेच गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास अल्पवयीन पीडित मुलगी ही शेजारच्या हरिषच्या भावाच्या मालकीच्या किराणा दुकानात बिस्कीट घेण्यासाठी गेली होती. मात्र हरिषने पीडित मुलीला घरात ओढून डांबून ठेवले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेची माहिती कुणाला सांगू नये, यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा : पहाटे लागलेल्या आगीने धारण केले रौद्ररूप आणि झाले हे नुकसान...
काही तासांनी पीडितेची हरिषच्या तावडीतून सुटका झाली. त्यानंतर तिने घर गाठले आणि घडलेली घटना पालकांना सांगितली. तिने पालकांना तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली.
त्यानंतर शिरखेड ठाणे गाठले. पोलिसांनी हरिष उर्फ हरी वाडीभस्मे यास शनिवारी (ता. चार) विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला बुधवार (ता. आठ)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.