नवनीत राणांबद्दल अपशब्द; रवी राणांनी केली मारहाण 

नवनीत राणांबद्दल अपशब्द; रवी राणांनी केली मारहाण 

अमरावती : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार रवी राणा व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणीमारी झाल्याने एकच खळबळ उडाली. दिनेश बूब यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. याच मुद्यावरून त्यांनी दिनेश बूब यांना मारहाण केली. 

कोंडेश्‍वर मार्गावर मधुबन वृद्धाश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू असताना दिनेश बूब कार्यकर्त्यांसह आले होते. रवी राणा संतापले व त्यांनी माईक दिनेश बूब यांच्या दिशेने भिरकाविल्याचे सांगण्यात येते. यावेळी चांगलाच गोंधळ झाला व एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. याप्रसंगी माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, मनपा आयुक्त संजय निपाणे, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे आयुक्त तसेच विलास इंगोले यांच्या मुलीसुद्धा कार्यक्रमाला आल्या होत्या. शिवाय वृद्धाश्रमातील वृद्ध महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा प्रकार झाल्याने सारेच भयभीत झाले.

... तर राजकारण सोडून देईल 
मी महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइनचा महत्वाचा सदस्य आहे. त्यामुळे महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी असे वक्तव्य केले असेल व ते राणा यांनी सिद्ध केले तर राजकारण सोडून देईल. झालेला प्रकार खेदजनक असल्याचे दिनेश बूब यांनी सांगितले.

महिलांचा अपमान सहन करणार नाही 
महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. जिल्ह्यातील लाख मतदारांचे ज्या प्रतिनिधीत्व करतात त्या खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अशा स्वरुपाचे वक्तव्य कदापि सहन केले जाणार नाही. कोणत्याही महिलेचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com