पेपर देऊन परतणारे तीन विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी; अनोळखी वाहनाची धडक

बबलू जाधव 
Wednesday, 20 January 2021

अक्षय राठोड (वय 18), शुभम होलगरे (वय 19), हर्षल ठाकरे (वय 18, सर्व रा. दिग्रस) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही मंगळवारी (ता.19) दुपारी साडेअकरा वाजता दिग्रसवरून यवतमाळला दुचाकीने पोष्टमनपदाचा ऑनलाइन पेपर देण्यासाठी आले होते. 

आर्णी (जि. यवतमाळ) : यवतमाळ येथून पोष्टऑफीसमधील पोष्टमनपदाचा ऑनलाइन पेपर देवून आर्णीकडे परत येत असताना दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यात तिघांपैकी दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता.19) रात्री साडेआठच्यादरम्यान तालुक्‍यातील दत्तरामपूर गावाजवळ दुपारी घडली.

अक्षय राठोड (वय 18), शुभम होलगरे (वय 19), हर्षल ठाकरे (वय 18, सर्व रा. दिग्रस) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही मंगळवारी (ता.19) दुपारी साडेअकरा वाजता दिग्रसवरून यवतमाळला दुचाकीने पोष्टमनपदाचा ऑनलाइन पेपर देण्यासाठी आले होते. 

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

पेपर देऊन सायंकाळी जाण्यासाठी दुचाकीने तिघेही निघाले. रात्री साडेआठच्यादरम्यान आर्णीतील दतरामपूर जवळीक चौपदरीकरण रस्त्यावर आर्णीकडून यवतमाळकडे अनोळखी वाहनाने दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या अपघातात अक्षय राठोड, हर्षद ठाकरे यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. तर, शुभम होलगरे जखमी झाला. 

घटनेची माहिती मिळताच आर्णीतील सामाजिक कार्यकर्ते रूपेश मारबते घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले. तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने जखमींना यवतमाळ येथे हलविण्यात आले. वृत्तलिहेस्तोवर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of 3 boys in Yavatmal