अमरावतीत अपघात; दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

अमरावती : मार्गावरील ड्रिमलॅण्ड या व्यापारी संकुलात कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (ता. 15) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

आनंद भीमराव रामटेके (वय 30, रा. पार्वतीनगर) असे मृत युवकाचे नाव असल्याचे नांदगावपेठ पोलिसांनी सांगितले. आनंद रामटेके हे ड्रिमलॅण्डमधील एका प्रतिष्ठानामध्ये नोकरीला होते. आज दुपारी दुचाकीने ते कामावर जात होते. रहाटगावजवळ अचानक त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे घसरून अपघात झाला. यामध्ये रामटेके गंभीर जखमी झाले. जखमी दुचाकीस्वारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आनंद रामटेके यांना तपासणीअंती डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in Amravati; Two bikers killed