पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अपघातांत वाढ

Maharashtra-Police
Maharashtra-Police

नागपूर - दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातात वाढ होत असून अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाहनचालकांच्या मृत्यूस वाहतूक पोलिसांचे हलगर्जीपणाचे धोरणही जबाबदार आहे. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पारदर्शक कारवाई आणि प्रामाणिकपणा कायम ठेवावा लागणार आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. वाहतूक पोलिसांचे ‘लक्ष्य’ केवळ सावज टिपणे आणि साहेबांसाठी ‘वसुली’ करणे यावर भर आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक चालान पुरूष वाहनचालकांवर करण्यावर भर दिला आहे. त्याचे वेगवेगळे कारणही आहेत.

महिलांच्या किंवा मुलींच्या पर्समध्ये मोजकेच पैसे असतात किंवा गोड हास्य देऊन लाडीगोडी लावत वाहतूक पोलिसांना पावती फाडण्यापासून परावृत्त करतात. वाहतूक पोलिसही विशेषतः महाविद्यालयीन मुलींवर दंडात्मक कारवाई करीत नसल्याचे उघड झाले आहे. मुलींच्या तुलनेत युवकांची गाडी पकडल्यास पटकन ‘सेटींग’ आणि लगेच दोन-चारशे रूपयांचा फायदा होतो. 
ही बाब हेरून मुलींवर कारवाई करण्यापेक्षा तेवढ्याच वेळात युवकावर कारवाई करून कमाई करून घेण्यावर पोलिस कर्मचाऱ्यांचा भर असल्याची चर्चा आहे.

स्टिंगमध्ये फसले तरीही...
लाच घेण्यात राज्य पोलिस पहिल्या क्रमांकावर असल्याची नोंद एसीबी महासंचालक कार्यालयात आहे. नागपुरात लाच घेताना अनेक वाहतूक पोलिस वाहनचालकांनी मोबाईलने केलेल्या स्टिंगमध्ये फसलेले आहे. तर अनेकांवर कारवाईसुद्धा झाली आहे. तरीही वाहतूक पोलिस लाच घेतल्याशिवाय वाहन सोडत नसल्याचे सर्रास बोलले जाते. 

महिला व मुलींचे प्रमाण जास्त
जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १ हजार ११७ रस्ते अपघात झाले. यामध्ये २५२ वाहनचालकांचा मृत्यू झाला. तर जानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीत शहरात ४१३ अपघात झाले असून यामध्ये ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वर्षाच्या रस्ते अपघातात मृत पावलेल्यांमध्ये महिला व मुलींचे प्रमाण जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com