कोलासर पुलावरून गाडी उलटली; एक ठार

accident
accident

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोलासर नजीक असलेल्या जीर्ण पुलाला कठडे नसल्याने बोलेरो गाडी खाली कोसळल्याने एक ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली. 

याबाबत सविस्तर असे की सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 चे महामार्ग विस्तारीकरणातून काम सुरू असल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक ही जीर्ण रस्ते व पुलातून सुरू आहे. नांदुरा ते मलकापूर दरम्यानच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे व जवळपास सर्व पुलांना कठडे नसल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटत असल्याने रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

आज सकाळी नांदुरा येथून परतीच्या मलकापूर मार्गावर असलेल्या तळणी येथील बोलेरो गाडी कोलासर पुलावरून कोसळल्याने यातील राजेंद्र पुरुषोत्तम नारखेडे वय 26 वर्ष हे जागीच ठार झाले असून सोबत असलेले नीना सोपान किनगे वय 50 हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशनच्या अँब्युलन्स मधून अकोला येथे हलविण्यात आले आहे. मृत तळणी येथील माजी जि.प.सदस्य पुरुषोत्तम नारखेडे यांचा लहान मुलगा असून मोठ्या मुलाने सहा महिन्यापूर्वीच आत्महत्या केली होती. एकुलत्या एक असणाऱ्या या मुलांचाही अपघात झाल्याने तळणी गावावर दुःखाचे सावट कोसळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com