अपघातातील मृतांची संख्या दहा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कळंब (जि. यवतमाळ) : यवतमाळ (वाघापूर) येथून मुलाचे साक्षगंध आटोपून पार्डी (सावळापूर) येथे परत येत असताना झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता दहा झाली आहे.
ही घटना सोमवारी (ता. 24) रात्री नऊच्या सुमारास चापर्डानजीक घडली होती. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे.

नितीन थूल याच्या साक्षगंधासाठी गावातील सचिन पिसे यांची क्रूझर गाडी किरायाने घेतली होती. चापर्डानजीक नागपूरवरून यवतमाळकडे जाणाऱ्या इंडियन गॅसच्या भरधाव ट्रकने क्रूझरला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात चालक सचिन बाबाराव पिसे, सुशीला रमेश थूल (मुलाची आई), अपर्णा प्रशांत थूल (मुलाची वहिनी), सक्षम प्रशांत थूल (वय पाच, पुतण्या), तानबाजी कुंडलिक थूल (काका, सर्व रा. पार्डी), सानिया शीलवंत बोंदाडे (वय 11, रा. पिंपळगाव), जानराव झामरे (रा. आसेगाव देवी) यांचा समावेश आहे. ठाणेदार नरेश रणधीर यांनी जखमींना तत्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले. मुलाचे वडील रमेश कुंडलिक थूल, सोनू शीलावंत बोंदाडे (बहीण), सुनील तानबाजी थूल (चुलत भाऊ) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात नवरा मुलगा नितीन थूल सुदैवाने किरकोळ जखमी झाला. त्याचा भाऊ प्रशीक थूल दुचाकीवर असल्याने बचावला.

Web Title: accident news