Accident News : राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

Accident News
Accident News esakal

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरगाव बस थांब्यानजीक एका दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री दरम्यान घडली. गोविंद देशमुख (२७) असे मृतक युवकांचे नाव आहे.

Accident News
Success story : आधी PSI नंतर तहसीलदार अन् आता पोलिस उपअधीक्षक! बदापूरच्या तरुणाच्या यशाचं कौतुक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू येथील गोविंद सुरेश देशमुख हा त्याच्या एमएच ३० बीजे ६३६९ क्रमांकाच्या दुचाकीवरून गावी जाण्यासाठी अकोलाकडून बोरगाव मंजू येथे येत होता. दरम्यान, डोंगरगाव बस थांब्यानजीक दुचाकीचा अपघात झाला.

या अपघातात गोविंद देशमुख हा युवक गंभीर जखमी झाला व या घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजय खंदाडे, पोलिस उपनिरीक्षक संजय सिरसाठ, हेडकॉन्स्टेबल किशोर सोळंके, योगेश काटकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. अपघात कसा झाला हे मात्र समजू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com