Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रेलिंगला धडकून कारला आग, होरपळून दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रेलिंगला धडकून कारला आग, होरपळून दोघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहेत. काल रात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महामार्गावर झालेल्या या अपघातात दोघांचा जळून मृत्यू झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कोळ या गावाच्या जवळ कार रेलिंगवरती आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, या कारला आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. ही कार नागपूरवरून शिर्डीच्या दिशेने जात होती.

अपघातात मृत झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस त्यांची ओळख पटवण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत. हा अत्यंत भीषण अपघात होता. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यामध्ये असणारे तीनपैकी दोन प्रवाश्यांनी आपला जीव गमावला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कोळ या गावाजवळ मध्यरात्री ही कार नगपूरवरून मुंबईकडे जात असताना अनियंत्रित होऊन रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिस आणि टोलप्लाझा येथील काही कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु आग इतकी भीषण होती की, कारचा जळून कोळसा झाला आहे. गाडीला लागलेली आग इतकी भीषण होती की, गाडीतील प्रवाशांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही. या अपघातात दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

स्विफ्ट कार क्रमांक एम.एच 02 सी आर 1459 मुंबई कॅरीडोरकडे जात असताना चायनल नंबर 305.6 सिमेंट डिव्हायडरला धडकली. कारने धडकताच जागीच पेठ घेतला त्यामध्ये डिझेलच्या सात ते आठ कॅन भरलेल्या अवस्थेत असल्याने आग वाढली. यामध्ये दोन व्यक्ती जागेवर जाऊन खाक झाले तर कारमधील एक व्यक्ती बाहेर फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.