आयशरची झाडाला धडक, 15 मजुर जखमी

deulgao
deulgao

देऊळगाव राजा : उसतोडीसाठी मजुर घेऊन पंढरपूर कडे जाणाऱ्या आयशर मिनी ट्रकची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात 15 मंजूर गंभीर जखमी झाले. सदर अपघात गुरुवारी रात्री सात वाजता देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान असोला फाट्याजवळ घडला. या अपघाताची माहिती अशी की, मध्यप्रदेश च्या खंडवा जिल्ह्यातील 26 मजुर आयशर ट्रकमध्ये घेऊन चालक पंढरपूर येथे जात होता.

गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास असोला फाट्याजवळच्या वळणावर भरधाव वेगाने असलेल्या आयशर ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटुन ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळला. या अपघातात ट्रकमधील मजुर जखमी झाले, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सारंग नवलकार पीएसआय गौरव सराग निलेश डाबेराव बिट जमादार विजय गिते पो. कॉ. शिवानंद केदार घटनास्थळी दाखल झाले.

रुग्णवाहिका व इतर वाहनांच्या मदतीने जखमींना देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शे. फारुख शे. युसुफ, रेश्मा बळवंत शिलाले , शांता शिलाले, कमल शिकारे काजले सुरेश दरबार राठोड, करिष्मा संतोष राठोड, प्रवीण प्रेमणारायन राठोड, जानकी विनोद राठोड, सावित्री वसंत जाधव, वसंत प्रभु राठोड जितेन कालु जाधव यांना गंभीर मार लागला असुन देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुरेश राठोड यांच्या फिर्यादी वरुन  पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com