विरुद्ध दिशेने आलेल्या दोन वाहनांची जोरदार टक्‍कर आणि...

accident
accident

कोंढा(जि.भंडारा) : जड मालवाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात ही नित्याचीच बाब आहे. कधी त्यात क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेला असतो तर कधी वाहकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि मोठे अपघात होतात. असाच भीषण अपघात मालवाहक ट्रक आणि टिप्परमध्ये झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी एकजण अत्यवस्थ आहे.
सिमेंट व लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकची व टिप्परची जोरदार धडक झाली. या धडकेने दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. एका ट्रकचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दुसरा चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज सकाळी सव्वासातच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेजवळ घडला. रायभान महादेव आरीकर (वय 45) रा. सोनेगाव याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंदन नंदलाल ठाकूर (वय 32) रा. चंद्रपूर आणि शेषराज धनराज नावघडे(वय 45) रा. सोनेगाव हे किरकोळ जखमी झाले.
पोहरा(ता.लाखनी) येथील(एम.एच.37ए.ए.3765)क्रमांकाचा ट्रक लोखंडी किस घेऊन पवनीच्या दिशेने जात होता. तर (एम.एच.40 बी.जी.7011) क्रमांकाचा कंटेनर चंद्रपूरवरून सिमेंट घेऊन भंडाऱ्याच्या दिशेने येत होता. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या या दोन्ही वाहनांची कोंढा येथील जि. प. शाळेसमोर जोरदार धडक झाली.

दोन्ही अवजड वाहने वेगात असल्याने या धडकेत ट्रक व टिप्परच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. ट्रकमध्ये फसलेला चालक रायभान आरीकर याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांची स्थिती गंभीर असून प्रथमोपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तर वाहक शेषराज नावघडे व टिप्परचालक चंदन ठाकूर यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर कोंढा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांची पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com