कोरोनामुळे घटले गुन्हेगारीसह अपघाताचेही प्रमाण

Accidental crime rate also decreased with Corona at Akola
Accidental crime rate also decreased with Corona at Akola

अकोला : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्यात २२ ते २९ मार्च या सात दिवसांच्या कालावधीत वाहन अपघाताला ब्रेक लागल्याचे चिन्ह आहे. तर याच सात दिवसांत शहरासह जिल्ह्यात तुरळक प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. असे जरी असले तरी मात्र, याच दिवसांत चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. तेव्हा कोरोनामुळे अपघाताला जरी ब्रेक लागल असला तरी या विषाणूपासून बचावासाठी पुन्हा काही दिवस घरातच राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशासह संपूर्ण जगात थैमान घातलेले आहे. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झालेली आहे. २२ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर सोमवारी जमाव बंदी असतानाही लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पोलिसांनी संचार बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली. जिल्ह्यातील सुमारे २४०० पोलिस रस्त्यावर उतरले आहेत.

जिल्ह्यात ठीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तपासणी करून आवश्यक असेल त्यालाच बाहेर पडण्यास परवानगी दिली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला जात आहे. त्याशिवाय त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत.

कोरोनामुळे बहुतांश लोक घरातच थांबून आहेत. या सर्वांचा परिणाम गुन्हेगारींचा घटनांवर झालेला दिसून येत आहे. किरकोळ मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, घरफोड्या याचे प्रमाण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. मात्र गेल्या सात दिवसांत अशा प्रकार घटना कुठे घडल्याच्या आढळून आलेल्या नाहीत. त्याशिवाय रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे.

सीसीटीव्ही कॅमेराद्वारे पोलिसांचा वॉच
शहरासह जिल्ह्यातील चेकींग पॉंईंटवर ठीक ठिकाणी लावण्यात आलेल्या अत्याधुनिक सीसी कॅमेऱ्याद्वारे पोलिस सर्व प्रमुख मार्गांवर लक्ष ठेऊन आहेत. कोणत्या मार्गावर काय स्थिती आहे, हे पोलिसांना कंट्रोलरुम मध्ये बसूनच लक्षात येते. त्यामुळे कोठे नागरिक बाहेर फिरताना आढळून आले, तर पोलिसांना त्वरीत त्यांना अटकाव घालणे सोपे जाते. त्यामुळे कॅमेराद्वारे शहरावर पोलिसांनी कडक निगराणी ठेवलेली दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com