शिक्षिकेसह दोघींचा अपघातात मृत्यू

चेतना कोलते
चेतना कोलते

नागपूर : शाळा आटोपून दुचाकीने मुलीसह घरी जात असलेल्या एका शिक्षिकेसह अन्य एका सायकलस्वार युवतीला ट्रकने धडक दिली. या अपघातात शिक्षिकेसह दोघींचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. चेतना कोलते असे मृत पावलेल्या शिक्षिकेचे तर ठगीयाबाई तुलाराम पटेल असे सायकलस्वार मुलीचे नाव आहे. दोन्ही अपघात कळमना हद्दीत झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास पारडी येथील नागनदीच्या पुलासमोर घडली. घटनेच्या वेळी चेतना धनंजय कोलते (49, चैतेश्वरनगर, वाठोडा) आणि त्यांची मुलगी दिव्या कोलते (20) या मेस्ट्रो दुचाकीने रहाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या होत्या. शाळेतून दोघ्याही मायलेकी भंडारा रोडने परतत होत्या. पारडी येथील नागनदीच्या पुलाजवळून येत असताना (एमएच 19 झेड 3786) क्रमांकाच्या ट्रकचालकाने आपले वाहन निष्काळजीपणाने चालवून दोघ्याही मायलेकीला धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने चेतनाचा जागीच मृत्यू झाला, तर दिव्या गंभीर जखमी झाली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास कळमना येथील काजल बिअरबारसमोर घडली. घटनेच्या वेळी श्‍यामनगर येथे राहणारी ठगीयाबाई तुलाराम पटेल (17) ही मुलगी आपल्या सायकलने कामावर जात होती. काजल बिअरबारसमोरून जात असताना समोरून आलेल्या एमएच 31 सीव्ही 6558 क्रमांकाच्या ट्रकचालकाने तिला धडक मारून जखमी केले. उपचारासाठी तिला श्रीभवानी हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com