भाजप नेत्यांनी बघितला "ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' 

भाजप नेत्यांनी बघितला "ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' 

नागपूर - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळावर प्रकाश टाकणारा "द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट शहरातील सर्वच भाजप नेत्यांनी काल बघितला. कॉंग्रेसतर्फे पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी या चित्रपटाचा वापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी चित्रपटगृहात तोडफोडही करण्यात आल्याने हा चित्रपट वादात सापडला आहे. 

"द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट शुक्रवारी शहरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पूर्वीच हा चित्रपट वादात अडकला. अनुपम खेर यांनी या चित्रपटात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका केली आहे. कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करून प्रचाराचा एक भाग असल्याची टीकाही या चित्रपटावर होत आहे. अनुपम खेर यांनी या चित्रपटाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विट करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला दिला. त्यामुळे एकूणच या चित्रपटावरून सध्या वादंग सुरू आहे. त्यात आज शहर भाजपाध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह आमदार गिरीश व्यास, महापौर नंदा जिचकार, श्रीकांत देशपांडे, माजी महापौर कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, जयप्रकाश गुप्ता, शिवाणी दाणी यांच्यासह अनेक शहर भाजप नेत्यांनी एम्प्रेस मॉल येथील पीव्हीआर येथे या चित्रपटाचा आनंद लुटला. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत या चित्रपटाचेही भांडवल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com