वासनकर वेल्थ मॅनेजमेंटविरुद्धचे दोषारोप योग्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी संचालक अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर व मिथिला विनय वासनकर यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्‍चित करण्यात आलेले दोषारोप योग्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. तसेच, या आरोपींचे संबंधित दोषारोपांविरुद्धचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला.

कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह अन्य आरोपींनी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. विशेष सत्र न्यायालयाने प्रकरणातील आरोपींविरुद्ध कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, व्यापाऱ्याने विश्वासघात करणे, धमकी देणे आदी दोषारोप निश्‍चित केले आहेत. यापैकी, व्यापाऱ्याने विश्वासघात करण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. हे दोषारोप अवैध असल्याचे आरोपींचे म्हणणे होते. आरोपींतर्फे ऍड. देवेंद्र चव्हाण यांनी, सरकारतर्फे ऍड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. न्यायमूर्ती झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accusations against Wasnakar Wealth Management justified