नरबळी प्रकरणातील आरोपी निर्दोष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नागपूर - बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणातील सर्व सात आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे. यातील सहा आरोपींना सत्र न्यायालयाने फाशी सुनावली होती, तर एक महिला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात दोषी आढळली होती. सरकारी पक्ष सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरंबा गावात सात वर्षीय सपना पळसकर हिचा नरबळी देण्यात आला होता. या प्रकरणात मनोज आत्राम, देविदास आत्राम, यादवराव टेकाम, पुनाजी आत्राम, मोतीराम मेश्राम आणि यशोदा मेश्राम यांना फाशी सुनावण्यात आली होती.

Web Title: The accused in the murder case are innocent