आरोपी विकेश म्हणाला, मला गोळ्या झाडून मारा... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

वर्धा कारागृहात विकेश याच्या जीवाला धोका असल्याची शक्‍यता लक्षात घेता वर्धा कारागृह प्रशासनाने त्याला नागपूर कारागृहात हलविण्याची विनंती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.

Image may contain: 1 person, closeup and outdoor

नागपूर : हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी विकेश नगराळे याने, "मला गोळ्या झाडून मारा,'' अशी विनंती पोलिसांना केली. विकेशला बुधवारी (ता. 12) पोलिस बंदोबस्तात वर्धा कारागृहातून नागपूर येथील कारागृहात आणले असता तो असे बोलल्याची माहिती पुढे आली. आरोपी विकेशला नागपूर येथील कारागृहातील विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्यावर प्रशासनाची चोवीस तास पाळत असणार आहे. 

वर्धेतून नागपूर कारागृहात रवानगी

वर्धा कारागृहात विकेश याच्या जीवाला धोका असल्याची शक्‍यता लक्षात घेता वर्धा कारागृह प्रशासनाने त्याला नागपूर कारागृहात हलविण्याची विनंती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेत त्याला नागपूर कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला गेला. बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वर्धा कारागृहात महत्त्वाच्या साक्षीदारांसमक्ष विकेशची ओळख परेड घेण्यात आली. त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात त्याला घेऊन पोलिस व कारागृहाचे जवान नागपूरकडे रवाना झाले. दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ते नागपूर कारागृहात दाखल झाले. विकेश याला नागपूर कारागृहातील विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तो अन्य कैद्यांच्या संपर्कात येऊ नये याचीही विशेष काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused Vikesh said, "Shoot me...