पोलिस ठाण्यातून पळाली आरोपी महिला!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

नागपूर : चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी महिलेने चक्‍क पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिस ठाण्यातून पळ काढला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. शीलाबाई मदनलाल कुंभार असे पळून गेलेल्या महिलेचे नाव आहे. यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र अशाप्रकारे हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची तिरुपती बालाजी येथील रहिवासी असलेली शीलाबाई हिला बुधवारी सायंकाळी बजाजनगर पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून ताब्यात घेतले होते. गुन्हा प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिला प्रतापनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. प्रतापनगर ठाण्यात महिला कोठडी (लेडीज लॉकअप) नसल्याने पोलिसांनी तिला रात्रभर ठाण्यात बसवून ठेवले. दरम्यान, पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान पोलिसांचा डोळा लागल्याचे लक्षात येताच शीलाबाईने ठाण्यातून पळ काढला. काही वेळेनंतर हा प्रकार लक्षात येताच सर्वत्र खळबळ निर्माण झाली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलिस ठाण्यांत या संबंधीची माहिती देण्यात आली. शीलाबाईचे वर्णन कळविण्यात आले. तिला पकडण्यासाठी पोलिसांनी शहरभर धावपळ चालवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती महिला पोलिसांना गवसली नव्हती, अशी माहिती आहे. मात्र, या प्रकरणी मीडियाला माहिती देऊ नये, असा वरिष्ठांचा आदेश असल्याचे पोलिस स्टेशन डायरीवरील हवालदार रणजित यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused women fled from the police station