हल्लेखोर वाघीण जेरबंद करण्यात यश

File photo
File photo

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील पद्मापूर-भूज परिसरात तीन बळी घेणाऱ्या वाघिणीला बेशुद्ध करीत जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. यानंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वाघिणीने पद्मापूर, भूज, एकारा, चिचगाव, हळदा, पवनपार आणि वांद्रा या परिसरात मागील काही महिन्यांपासून नागरिकांवर हल्ले केले होते. यात तिघांना जीवसुद्धा गमवावा लागला. त्यामुळे नागरिक चांगलेच दहशतीत जीवन जगत होते. वनविभागाने वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नायगमकर यांच्या नेतृत्वातील पथकाने वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली. बुधवारी वाघिणीला बेशुद्ध करण्यात यश आले. वाघिणीला गोरेगाव येथे पाठविण्यात आले. डॉ. खोब्रागडे, भोंगाळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com