धोकादायक औषध विकणाऱ्यांवर कारवाई करा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

नागपूर : राज्य शासनाला आरोग्यास धोकादायक व बंदी असलेली औषधे विकणाऱ्यांवर ड्रग्ज ऍण्ड कॉस्मेटिक्‍स ऍक्‍टअंतर्गत कारवाई करता येते. यामुळे राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना अशा औषधांची विक्री थांबविण्यासाठी कारवाई करण्यास सांगावे, असे निर्देश न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. 

यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित होती. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्यास धोकादायक 355 मिश्र औषधांचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. याविषयी 10 मार्च 2016 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोणतेही औषध बाजारात विक्रीस आणण्यासाठी आवश्‍यक चाचण्या करणे गरजेचे आहे. निर्धारित चाचण्यात यशस्वी ठरलेल्या औषधांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाद्वारे मान्यता दिली जाते. 

यानंतर अशा औषधांचे उत्पादन करण्यासाठी संबंधित राज्य शासनाकडून परवानगी घेणे आवश्‍यक आहे. ड्रग्ज कंट्रोलरची मान्यता नसलेल्या औषधांच्या उत्पादनास राज्य शासन परवानगी देऊ शकत नाही. तसेच अशा औषधांची विक्री होत असल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. याप्रकरणात केंद्र शासनातर्फे ऍड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली.

Web Title: Act against shopkeepers who sell banned drugs