वाडीत 88 स्कूलबसवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

वाडी (जि. नागपूर) : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी एमआयडीसी वाहतूक पोलिसांतर्फे वाडी, एमआयडीसी, हिंगणा परिसरात सुरक्षामोहीम राबवून 88 स्कूलबसवर कारवाई केली. यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे देण्यात आले. या कारवाईसाठी पोलिसांनी वेगवेगळी टीम तयार केली होती. परवाना नसलेले 17 वाहने, चालक गणवेश घालून नसलेले 27 वाहने, ओव्हरसीट 3, बिल्ला नसलेले 9, नंबर प्लेट नसलेले 15, सीट बेल्ट न लावलेला 1 अशा प्रकारचे एकूण 88 स्कूल बस, व्हॅंन व ऑटो रिक्‍शाचालकांवर कारवाई करण्यात आली. परिसरातील शाळेला भेट देऊन पालकांना व विद्यार्थ्यांना स्वःसुरक्षाबद्दल सतर्क करण्यात आले.

वाडी (जि. नागपूर) : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी एमआयडीसी वाहतूक पोलिसांतर्फे वाडी, एमआयडीसी, हिंगणा परिसरात सुरक्षामोहीम राबवून 88 स्कूलबसवर कारवाई केली. यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे देण्यात आले. या कारवाईसाठी पोलिसांनी वेगवेगळी टीम तयार केली होती. परवाना नसलेले 17 वाहने, चालक गणवेश घालून नसलेले 27 वाहने, ओव्हरसीट 3, बिल्ला नसलेले 9, नंबर प्लेट नसलेले 15, सीट बेल्ट न लावलेला 1 अशा प्रकारचे एकूण 88 स्कूल बस, व्हॅंन व ऑटो रिक्‍शाचालकांवर कारवाई करण्यात आली. परिसरातील शाळेला भेट देऊन पालकांना व विद्यार्थ्यांना स्वःसुरक्षाबद्दल सतर्क करण्यात आले. तसेच शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल वाहतूक पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी चर्चा केली.ही कारवाई डीसीपी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी विभाग पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक विनोद गिरी, पोलिस उपनिरीक्षक किशोर गवई, विनोद सिंग, देवकुमार मिश्रा, जयशंकर पांडे, संजयसिंग बैस, अरविंद नाईक, अनिल वलके, राजेश बांबोले, राजेश कोडापे, शेखर वरखडे, मिलिंद कोल्हे, रवींद्र धुलसे, संतोश कोरडे, सुरेश टेलेवार, अनिता चव्हाण, अनिता डोईफोडे, जयश्री कडू यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 88 schoolbuses in Wadi