दारूविक्रेत्यांच्या आवळल्या मुसक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

  नागपूर ः दारूभट्ट्यांवरील कारवाईनंतर मुद्देमाल नष्ट करताना ग्रामीण पोलिस. 
नागपूर/केळवद, ता. 5 ः जिल्ह्यात निवडणुक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी अवैध दारूअड्ड्यांवर कडक कारवाईची पावले उचलली आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध अड्ड्यांवर छापे मारून अवैध दारूविक्रेत्यांच्या मुसक्‍या आवळणे सुरू केले आहे. शनिवारी नागपूर ग्रामीण पोलिसांनी तिडंगी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात हातभट्टी लावून मोहफुलाची गावठी दारू काढीत असताना घातलेल्या छाप्यांत 12 लाख 76 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

शनिवारी (ता. 5) 8.45 वाजताच्या सुमारास तिडंगी पारधीबेडा येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छापे घालण्यात आले. दरम्यान, तेथे ठिकठिकाणी अवैधरीत्या हातभट्टी लावून मोहफूल दारू काढताना काही आरोपी आढळले. दगड विटांच्या चुलीवर लोखंडी ड्रम ठेवून नळीद्वारे मोहफूल दारू काढण्यात येत होती. बेड्यावील घरांच्या आजूबाजूला निळ्या रंगाच्या 200 लिटरच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये मोहफूल रसायन सडवा भरून होता. दारू काढणारे आरोपी पोलिसांना पाहून जंगलाच्या दिशेने पळून गेले. घटनास्थळावरून निळ्या रंगाच्या 200 लिटरच्या 90 ड्रममध्ये एकूण 18 हजार लिटर मोहफूल रसायन सडवा, 45 हजारांची 450 लिटर तयार मोहफूल दारू, मोहफूल 70, निळ्या रंगाचे 90 खाली ड्रम, लोखंडी ड्रम, 3 हजार लिटर मोहफूल रसायन, 15 टन जळाऊ लाकूड, 150 किलो गूळ, 50 किलो नवसागर, प्लॅस्टिक पाइप, जर्मन केटली असे इतर साहित्य, असा एकूण 12 लाख 76 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. आरोपी अविनाश संजय पवार, टिपू किशोर मारवाडी, दिलीप संतोष राजपुत, चंद्रपाल संतोष राजपुत, दीपक संतोष राजपुत (सर्व रा. पारधीबेडा तिडंगी) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश मट्टामी करीत आहेत. दुसऱ्या कारवाईत देवलापार पोलिस ठाण्यांतर्गत चोरबाहुली शिवारात शुक्रवारी (ता. 4) देवलापारचे ठाणेदार पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांना मिळालेल्या माहितीवरून परिसरातून वाहणाऱ्या नाल्याजवळच्या जंगलात काही व्यक्‍ती भट्टी लावून लावून मोहफूल दारू गाळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून घटनास्थळी छापा घातला. आरोपी चोरबाहुली शिवारातील नाल्यामध्ये हातभट्टी लावून मोहफूल गावठी दारू गाळताना आढळले. आरोपींनी पोलिसांना पाहून पळ काढला. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता प्लॅस्टिक पॉलिथीनमध्ये दहा हजार लिटर मोहफूल सडवा रसायन, 13 निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये 2600 लिटर मोहफूल हातभट्टी दारू, 13 निळ्या रंगाचे ड्रम, 4 लोखंडी  ड्रम, 3 जर्मनी केटली, 1 प्लॅस्टिक पाइप, 10 मण जळाऊ लाकूड व इतर दारू गाळण्याचे साहित्य आढळून आले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against alcoholic beverages in the district