तिवसा येथे अवैध दारूविक्रीविरुद्ध कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील दारूअड्ड्यांवर छापे टाकण्याचे सत्र सुरूच असून, दोन दिवसांपूर्वी मोझरी येथून 1 लाख 39 हजारांची गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर शुक्रवारी (ता. नऊ) पुन्हा तिवसा हद्दीतील अशोकनगर व तळेगाव ठाकूर येथे पोलिसांनी कारवाया केल्या. त्यामध्ये एकूण 64 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशोकनगर येथील महिला गावठी दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी तेथे शुक्रवारी दुपारी एक वाजता छापा टाकला. तेथून 60 हजार रुपये किमतीचा 3 ड्रम 600 लिटर मोहा सडवा व गावठी दारू, असा एकूण 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपी महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला, तर दुसरी कारवाई दुपारी 3 वाजता तळेगाव ठाकूर येथे करून तेथून सतीश थोरात याला 1 पेटी देशीदारूसह अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against illegal liquor in Tivasa