यवतमाळ - सहाय्यक पोलिस निरीक्षकावर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

यवतमाळ : जिल्ह्यातील मारेगांव पोलिस स्टेशन येथे राहुलकुमार राउत याने एका प्रकरणात आरोपी करणार नाही असे सांगत फिर्यादी कडुन पैसे उकळले. अधिक जास्त पैश्याची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीची कुणकुण लागताच राहुलने फिर्यादीचे अपहरण करुन त्याच्याजवळचे व्हॉईस रेकॉर्डर आणि मोबाईल नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाने राहुल विरोधात त्याच्याच पोलिस ठाण्यात जबरी चोरी; अपहरण आणि पुरावे नष्ट करणे अश्या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल केले आहे. धाडीची कुणकुण लागल्याने राहु सध्या फरार आहे पोलिस त्याच्या मागावर गेली आहे. राहुलची कार्यशैली पहिल्या पासूनच विवादित राहिली आहे.

Web Title: action of anti corruption bureau on Assistant Police Inspector yewatmal