त्या चार कर्मचार्‍यांवर निलंबनाची कुर्‍हाड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

डोणगाव येथील बूथ क्रमांक 120 मध्ये मॉकपोल मतदान डिलीट न करता प्रत्यक्ष उमेदवारांसाठी नागरिकांनी मतदान केले.

बुलडाणा  : बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी दुसर्‍या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान पार पडले. सदर मतदान पार पडण्यासाठी निवडणूक विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणेने सातत्याने कर्मचारी व अधिकार्‍यांना निर्देश दिले होते. त्यावर मेहनतही घेतली होती. परंतु, डोणगाव येथील बूथ क्रमांक 120 मध्ये मॉकपोल मतदान डिलीट न करता प्रत्यक्ष उमेदवारांसाठी नागरिकांनी मतदान केले. यामुळे प्रत्यक्ष झालेले मतदान आणि इव्हीएममधील मतदान यामध्ये तफावत आढळली होती.

याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी आयोगाकडे अहवाल पाठविला होता. यावर 24 एप्रिलला एका बूथवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश तर, हलगर्जीपणा केल्याप्रकरणी  (ता.22) केंद्रावरील चारही कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

Web Title: Action for suspension of four election employees