शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई, शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा

action take against school if it is closed in amravati
action take against school if it is closed in amravati

अमरावती : कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येत नसल्याने काही शाळांतील शिक्षकांनीही शाळेकडे पाठ फिरवल्याचे भीषण वास्तव शिक्षण सभापती व इतरांसमोर येत आहे. यापुढे शालेय वेळेत शाळेला कुलूप दिसल्यास शिक्षकांसह पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिला.

कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शिक्षक संघटनांनी सुरुवातीला हो-नाही करत कसेतरी हे सर्वेक्षण शेवटास नेले. यादरम्यान अमरावती जिल्हापरिषदेचे शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी जिल्ह्यातील काही शाळांना भेटी द्यायला सुरुवात केली. या भेटीदरम्यान त्यांना काही शाळा कुलूपबंद आढळल्या. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडल्याने शिक्षक अद्यापही शाळेत रुळले नाहीत. राज्य शासनाने सुरुवातीला 50 टक्‍के, नंतर 100 टक्‍के व आता पुन्हा 50 टक्‍के उपस्थितीचे आदेश दिले. मात्र काही शिक्षकांना अपडाउन गैरसोयीचे व परवडत नसल्याने शाळा कदाचित बंद राहत असाव्यात, असे काहींचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे इयत्ता पहिली ते आठवीचे पुरेसे अध्यापन झाले नसल्याने या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार वर्गोन्नत केले जाणार आहे. अगोदर 50 टक्‍के उपस्थिती त्यात वेळेचे बंधन पाळल्या जात नाही. अशा परिस्थितीतही चक्क शाळा बंद राहत असल्याने समाजात शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. शिक्षण सभापती व इतर पदाधिकाऱ्यांच्या शाळा भेटीदरम्यान शाळा बंद आढळून आल्याने त्याचे ताशेरे पर्यवेक्षीय यंत्रणेवर ओढल्या जात आहे. यापुढे शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा तसेच बांधकाम सुरू असलेल्या शाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक किंवा शिक्षक आढळून न आल्यास शिक्षक, मुख्याध्यापकांसह पर्यवेक्षकीय यंत्रणेला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा शिक्षणाधिकाऱ्यांचा संदेश सर्वत्र व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com