३० लाख जमा करा, मग जामीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नागपूर - नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन देऊन फसवणूक करणारी चंद्रकला कैलासगिरी खर्डेकरला (४९, रा. नांदगाव खंडेश्‍वर, अमरावती) फसवणूक केलेल्या रकमेतील ३० लाख रुपये जमा करा, असे आदेश मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने देत सशर्त जामीन दिला. या प्रकरणी न्यायाधीश एस. एस. दास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. फसवणूक प्रकरणात चंद्रकलासोबत अजय दिनेश खोबरकर (३३), नरेंद्र वासुदेव पुंडकर (४८) आणि राणी अशोक पुरी (२५) यांचादेखील समावेश होता. यापैकी राणी फरार आहे. ऑगस्ट २०१५ ते २८ मार्च २०१६ दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी अनेकांना जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन दिले.

नागपूर - नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन देऊन फसवणूक करणारी चंद्रकला कैलासगिरी खर्डेकरला (४९, रा. नांदगाव खंडेश्‍वर, अमरावती) फसवणूक केलेल्या रकमेतील ३० लाख रुपये जमा करा, असे आदेश मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने देत सशर्त जामीन दिला. या प्रकरणी न्यायाधीश एस. एस. दास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. फसवणूक प्रकरणात चंद्रकलासोबत अजय दिनेश खोबरकर (३३), नरेंद्र वासुदेव पुंडकर (४८) आणि राणी अशोक पुरी (२५) यांचादेखील समावेश होता. यापैकी राणी फरार आहे. ऑगस्ट २०१५ ते २८ मार्च २०१६ दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी अनेकांना जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन दिले. त्या आधारावर आरोपींनी त्यांच्याकडून तब्बल ४३ लाख उकळले; परंतु नोकरी लावून दिली नाही. यामुळे पीडितांनी केलेल्या तक्रारीनुसार सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक केली. चंद्रकला हिने या प्रकरणी जामिनासाठी अर्ज केला होता. चंद्रकला हिने फसवणुकीतील ३० लाख रुपये कोर्टापुढे सादर करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर कोर्टाने सशर्त जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. 

न्यायालयापुढे सादर करण्यात आलेली रक्कम पीडितांमध्ये वाटण्याचे अधिकार न्यायालयाला राहणार आहेत. या प्रकरणी सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अजय माहूरकर यांनी कामकाज केले.

Web Title: Add 30 lacs, then get bail