व्यसनमुक्ती केंद्र नावापुरते

केवल जीवनतारे
गुरुवार, 3 मे 2018

नागपूर - मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरी व ग्रामीण भागात मुख कर्करोग, हिरड्यांचे आजार वाढले. याशिवाय दंतचिकित्सा विभागाचे बळकटीकरण करण्याच्या हेतूने जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात आले. मात्र, हे व्यसनमुक्ती केंद्र केवळ नावापुरते असल्याची माहिती पुढे आली. 

नागपूर - मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरी व ग्रामीण भागात मुख कर्करोग, हिरड्यांचे आजार वाढले. याशिवाय दंतचिकित्सा विभागाचे बळकटीकरण करण्याच्या हेतूने जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात आले. मात्र, हे व्यसनमुक्ती केंद्र केवळ नावापुरते असल्याची माहिती पुढे आली. 

राज्यातील जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत मौखिक आरोग्य व दंतोपचार सेवेचा विभाग निर्माण करण्यासाठी १०६३ पदांची निर्मिती करण्यात येणार होती. परंतु, यासंदर्भात अद्याप पाहिजे त्या प्रमाणात केंद्राला आकार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून पावले उलचण्यात आली नाही.  दोन वर्षांपूर्वी शालेय आरोग्य तपासणीत मुलांमध्ये ९२ टक्के दंतक्षयाचे प्रमाण आढळले होते.

तर, ६० टक्‍क्‍यांच्या वर हिरड्यांच्या आजार असल्याचेही पुढे आले. याशिवाय तरुणाईत ७० टक्‍क्‍यांवर पानमसाला, गुटखा खाणे आणि धूम्रपानाचे प्रमाण आढळले होते. राज्यात सध्या १५ हजार ७०० नोंदणीकृत दंत शल्यचिकित्सक आहेत. तर शासकीय दंत रुग्णालय अवघे तीन आहेत. तर २९ खासगी दंत महाविद्यालये आहेत. दरवर्षी बीडीएस पदवी घेऊन १४०० ते १५०० दंत शल्यचिकित्सक प्रत्येक वर्षी तयार होतात. मात्र, अवघे १० ते १५ टक्के दंत चिकित्सक ग्रामीण भागात सेवा देतात. यामुळे गावखेड्यातील माणूस मौखिक आरोग्याच्या सोयी-सुविधांपासून वंचित राहतो. ही बाब लक्षात घेत राज्यातील जिल्हा रुग्णालये, २४ उपजिल्हा रुग्णालये, ३ सामान्य रुग्णालयांतून दंत उपचाराच्या सेवा प्रभावीपणे पुरविण्याचा संकल्प राज्याच्या आरोग्य विभागाने सोडला.

झळकतात केवळ जनजागरणाचे ‘फलक’ 
जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात या योजनेंतर्गत दातांवर कॅप बसविणे, रुट कॅनल, जबड्यावरील शस्त्रक्रिया, कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री, तोंडाचा कॅन्सर निदान, दंत परिवेष्टन शस्त्रक्रिया या सेवा  देण्यासाठी रुग्णालयात अत्याधुनिक डेंटल युनिट, क्ष-किरण चिकित्सा, सर्जिकल किट, निर्जंतुकीकरणाच्या सोयी पुरविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या.

ग्रामीण रुग्णालयातदेखील दंतचिकित्सा विभाग सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार दंत सेवा विभाग तयार केले. त्याच ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र तयार केले. परंतु, व्यसनमुक्ती केंद्राचे फलक तेवढे रुग्णालयात झळकतात. रुग्णांमध्ये ४५ टक्के रुग्ण मुख कर्करोगाने पीडित आहेत. परंतु, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांत तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशन हरवले आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांच्याशी संपर्क साधला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Addiction free Center