आदित्य ठाकरेंचा आज विद्यार्थ्यांसोबत संवाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नागपूर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा नागपुरातून सुरू होणार असून उद्या, मंगळवारी ते हिंगणा येथील प्रियदर्शिनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

नागपूर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा नागपुरातून सुरू होणार असून उद्या, मंगळवारी ते हिंगणा येथील प्रियदर्शिनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
विदर्भात नागपुरातून उद्या, 27 ऑगस्टपासून सेनेच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ होत आहेत. यानिमित्त आदित्य ठाकरे उद्या नागपुरात येत आहेत. ते हिंगणा येथील प्रियदर्शिनी कॉलेजमध्ये "आदित्य संवाद' कार्यक्रमांतर्गत दुपारी 12 वाजता तरुणाईशी चर्चा करतील. ते विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जाणून घेणार आहेत. 28 ऑगस्टला ते यवतमाळ, वाशीम, 29 ऑगस्ट रोजी अकोला बुलडाणा तर मराठवाड्यातील औरंगाबाद येथे 30 तर जालना येथे 31 ऑगस्टला ते भेट देणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray interacts with students today